मनोरंजन

Blog single photo

आर माधवन यांच्या 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट'ची नूतन झलक गुरुवारी

31/03/2021
नवी दिल्ली
31
मार्च   (हिं.स)प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत
प्रथितयश बहुभाषी अभिनेते आणि बहुमुखी कलाकार 
रंगनाथन माधवन ऊर्फ आर माधवन यांच्या बहुचर्चित
,बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी   ' रॉकेटरी : द नंबी इफेक्ट ' या चित्रपटाची नूतन झलक गुरुवार 1  एप्रिल रोजी 
संध्याकाळी 5 वाजता सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.या
संदर्भात माधवन यांनी स्वतः ट्वीटरद्वारे घोषणा केली.
 हिंदी, इंग्रजीतमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत ही नवीन झलक प्रदर्शित केली जाणार आहे. 

आर  माधवन  ' रॉकेटरी : द नंबी इफेक्ट ' च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. हिंदी, तामिळ  तेलुगू , मराठी आणि इंग्रजीचे उत्तम ज्ञान असलेले  आर  माधवन  अखिल भारतीय पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. जानेवारी महिन्यात   आर माधवन  यांचा  मारा '   तर  मागील वर्षी  निःशब्दम हे दोन चित्रपट ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाले होते.

 ' रॉकेटरी : द नंबी इफेक्ट या विशेष चित्रपटात माधवन  यांनी  लेखनदिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. नंबी नारायणा यांची  भूमिका  माधवन साकारीत आहेत. रॉकेटरी चित्रपटाची निर्मिती ट्रायकलर फिल्मस् आणि वर्गीस  मलून पिक्चर्स  यांनी केली आहे . पहिले चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत माधवन करणार होते मात्र काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांना ही जबाबदारी सोडावी लागली. 

हिंदी, इंग्रजीतमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत
प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात नंबी नारायण यांच्या जीवनातील संघर्ष
सिने-रसिकांनी  अनुभवाययला मिळणार आहे.
रॉकेटरीचे चित्रीकरण  आणि अन्य निर्मिती
कार्य अंतिम टप्पात आले असून लवकरच प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येईल असा
अंदाज आहे.नंबी नारायणा 
हे  इस्त्रो माजी वैज्ञानिक असून
1996 साली
  हेरगिरीच्या आरोपावरून त्यांना
अटक करण्यात आली होती मात्र नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. नंबी
नारायणा
  यांनी दिलेल्या योगदानाबद्ल
केंद्र सरकाने
  त्यांना पद्म भूषण
पुरस्काराने सन्मानित केले. ' रॉकेटरी : द नंबी इफेक्ट ' याद्वारे जवळपास पंधरा वर्षानंतर
रंगनाथन माधवन आणि  अभिनेत्री सिमरन बग्गा
यांची जोडी  रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
माधवन यांच्या
' रॉकेटरी
: द नंबी इफेक्ट
' या चित्रपटात सिमरन बग्गा वैज्ञानिक नंबी नारायणा यांच्या पत्नीच्या
भूमिकेत दिसणार आहे. इस्त्रो माजी वैज्ञानिक नंबी नारायणा  यांची मुख्य भूमिका माधवन साकारणार आहेत.याबाबत स्वतः माधवन यांनी सिमरच्या भूमिके
बाबत  इंस्टाग्रामवरून माहिती दिली होती. "
पंधरा वर्षानंतर   थिरु आणि इंदिरा होणार
श्री आणि सौ नंबी नारायणा ". सिमरन यांनीही माधवन सोबत पुन्हा काम करण्याबाबत
ट्विटरवर आनंद व्यक्त केला होता.
माधवन आणि सिमरन यांनी  ' पार्थाले परावसम ' आणि मणी रत्नम यांच्या ' कन्नथील  मुथा मित्ताला ' या तमिळ चित्रपटात काम केले होते.
त्यावेळी  थिरु आणि इंदिराची जोडी खूप
गाजली होती.


 हिंदुस्थान समाचार


 
Top