मनोरंजन

Blog single photo

जर्सी चित्रपटाचे वितरण अधिकार राकेश सिप्पी यांच्याकडे

08/02/2020

मुंबई,  8 फेब्रुवारी  (हिं. स)अभिनेते शाहिद कपूर
यांच्या जर्सी चित्रपटाच्या संपूर्ण भारतातील वितरण अधिकार सुप्रसिद्ध चित्रपट
वितरक राकेश सिप्पी यांनी मिळवले आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी
ट्विटर द्वारे माहिती दिली.अभिनेते शाहिद कपूर सध्या जर्सी चित्रपटाच्या चित्रीकरणात
व्यस्त आहेत.तेलुगू प्रेक्षकांची मनं
जिंकल्यानंतर अभिनेते नानी यांच्या जर्सी चित्रपटाची निर्मिती हिंदीत केली जाणार
आहे.  अभिनेते  नानी यांना साकारलेला क्रिकेटपटू 
' अर्जुन  ' आता शाहिद कपूर साकारणार
आहेत. शाहिद कपूर  यांच्या सोबत  या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील काम
करणार आहेत.जर्सी हिंदी भाषेतील
निर्मितीची जबाबदारी सुप्रसिद्ध सिने-निर्माते अल्लू अरविंद दिल राजू  आणि अमन गिल यांच्या सहयोगाने सांभाळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तींनानुरी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. विशेष म्हणजे
गौतम तींनानुरी यांनीच मूळ तेलुगू चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथालेखन केले
आहे.  चित्रपट
28  ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित
होणार आहे.मूळ चित्रपटात श्रद्धा
श्रीनाथ यांनी बजाविलेल्या भूमिकेत मृणाल ठाकूर दिसणार आहेत.हिंदी आवृत्तीसाठी
क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत जेष्ठ अभिनेते आणि शाहिद कपूर यांचे वडील पंकज
कपूर दिसणार आहे.  मूळ चित्रपटात ही भूमिका जेष्ठ अभिनेते आणि बाहुबली चित्रपटातील कटप्पा
म्हणजेच सत्यराज यांनी निभावली होती.हिंदुस्थान समाचार


 
Top