क्षेत्रीय

Blog single photo

भाजप ही शिकणारी पार्टी असून या पराभवातून आम्ही शिकणार - प्रकाश जावडेकर

14/02/2020

पुणे, 14 फेब्रुवारी (हिं.स) : दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्यानंतर काँग्रेसची मते कोणत्या पक्षाकडे गेली हे माहीत नाही. भाजप ही शिकणारी पार्टी असून, या पराभवातून आम्ही शिकणार आहोत,'
असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये काँग्रेस लुप्त झाल्याने भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात सरळ लढत झाली. त्यामुळे पराभव पत्करावा लागला. असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात 'दिशा' अंतर्गत विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'गोली मारो' आणि 'भारत पाक' ही विधाने भोवल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. याबाबत विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले,' या कारणाबरोबरच इतरही काही कारणे आहेत.'
हिंदुस्थान समाचार 


 
Top