अंतरराष्ट्रीय

Blog single photo

तैवानमध्ये रेल्वे रूळावरून घसरून 36 प्रवाशांचा मृत्यू; 72 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

02/04/2021

नवी दिल्ली, ०२ एप्रिल, (हिं.स.) : तैवानमध्ये रेल्वे रूळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघात 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, या दुर्घटनेत 72 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. 

अपघात झालेल्या रेल्वेतून 350 प्रवासी प्रवास करत होते. पूर्व तैवानमध्ये रेल्वे लाईनवरील एका पुलावरुन ट्रक रेल्वे रुळावर अचानक कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही रेल्वे तैतुंगला जात होती त्यावेळी ह्युलियन प्रांताच्या उत्तर भागात हा अपघात झाला.
या अपघातात रेल्वेचे चार डबे अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातग्रस्त रेल्वे अजूनही त्याच बोगद्यात अडकली असल्याची माहिती आहे.
तैवानच्या परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व तैवानमध्ये रेल्वे रूळावरून ट्रेन घसरल्याने 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार


 
Top