ट्रेंडिंग

Blog single photo

कर्नाटक : सहा जणांना जीवंत पेटवले

03/04/2021

बंगळुरू, 03 एप्रिल (हिं.स.) : कर्नाटकातील कोडागु जिल्ह्यामधील एका गावात शनिवारी सकाळी 6 लोकांना जीवंत पेटवून दिल्याची भयावह घटना घडली. या हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नही. 

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार कोडागु जिल्ह्यामधील विरापेट तालुक्यातल्या मुगुतकेरी गावातील गुंड येराव बोजा याने शनिवारी सकाळी एका घरावर पेट्रोल टाकून आग लावली. यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर तिघांचे म्हैसूर येथील रुग्णालयात निधन झाले. मृतकांमध्ये सीते, बेबी, विश्वास, विश्व, प्रकाश आणि प्रार्थना अशा 6 जणांचा समावेश आहे. मृतकांमध्ये सीते आणि बेबी या दोन महिला असून इतर सर्व अल्पवयीन बालके आहेत. या घटनेनंतर आरोपी फरार झालाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरूय. 
हिंदुस्थान समाचार
 
Top