राष्ट्रीय

Blog single photo

दमण-दीवचे खासदार डेलकर यांचा मुंबईत संशयास्पद मृत्यू

22/02/2021

मुंबई, 22 फेब्रुवारी (हिं.स.) : दमण-दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झालाय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी खा. डेलकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या जवळून गुजराती भाषेतील एक चिठ्ठी सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तब्बल 7 वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या लोकसभा सदस्याचा असा संशयास्पद रीत्या म-मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 

खा. मोहन डालकर दादरा -नगरहवेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. डेलकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 1989 पासून ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत आहेत. खा. डेलकर 1989 मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि खासदार झाले. त्यानंतर भारतीय नवशक्ती पार्टीकडून ते निवडणूक लढले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 2019 ची निवडणूक ते अपक्ष म्हणूनच लढले होते आणि जिंकले होते. 
हिंदुस्थान समाचार 
Top