राष्ट्रीय

Blog single photo

सुप्रिया सुळे यांनी घेतली जावेद अख्तर यांची भेट

07/01/2020

मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसचच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक कवी आणि माजी राज्यसभा खासदार जावेद अख्तर यांची भेट घेतली. या भेटीबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली.  जेएनयु हिंसाचार प्रकरणावर जावेद अख्तर विविध माध्यमांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. दर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा हिंसेची निंदा केली आहे आणि केंद्र सरकारच्या नीतीवर घणाघात केला आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top