अपराध

Blog single photo

भंडारा येथे 4 दुकानदारावर दंडात्मक कारवाई

29/05/2020

भंडारा, 29 मे (हिं.स.)  : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आलीय. देशात सध्या चौथ्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरू असून या काळात अटी-शर्तींसह काही दुकानांना परवानगी देण्यात आलीय. परंतु, भंडारा शहरात दुकानदार जिल्हाधिका-यांच्या निर्देशांची पायमल्ली करत 5 वाजेनंतर दुकान सुरू ठेवत होते. अशा 4 दुकानदारांना नगरपालिकेने दंड आकारला आहे. 

भंडारा जिल्ह्यत गेल्या  6 दिवसांपासून  दुकाने सुरू आहेत. ही दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी काढले आहे. मात्र , काही दुकानदार संध्याकाळी  5 नंतरही दुकाने सुरू ठेवायचे. सुरवातीला या दुकानदारांना व्यापारी संघटनेच्या पदाधिकारांनी 5 वाजे बंद करण्याची विनंती केली. मात्र तरीही ते ऐकत नव्हते. त्यामुळे  व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, नगर पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनी शहरात फिरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करण्याऱ्या 4 दुकान मालकांवर प्रत्येकी 5 ते 20 हजार रुपये दंड आकाराला. या पैकी एक दुकानदार हा नगर पालिकेचा कर्मचारी असल्याने त्याने याची तक्रार एका नगर सेवकाला केली आणि नगर सेवकाने मुख्याधिकारी यांना तक्रार केली. दंडात्मक कारवाई करूनही केवळ नेत्यांना खुश ठेवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी या अधिनस्त कर्मचाऱ्याला बोलावून त्या नेत्यासमोर खडसावले. त्यामुळे या दंडात्मक कारवाईवरून दुकानदार आणि नगरपालिका प्रशासन समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. 

हिंदुस्थान समाचार 


 
Top