अपराध

Blog single photo

सिलीगुडी येथे 2 बांगलादेशी तरुणांना अटक

13/09/2019

सिलीगुडी, 13 सप्टेंबर (हि.स.) पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे गुरुवारी एसएसबीच्या 41  व्या बटालियनने भारत-नेपाळ सीमेवरील पाणीटंकी  येथून दोन बांगलादेशी तरुणांना अटक करण्यात आलीय. हे  दोन्ही तरुण बांगला देशातील ब्राह्मणबारिया येथील रहिवासी आहेत. 

यासंदर्भात एसएसबीने सांगितले की, त्यांच्याकडून कायदेशीर कागदपत्रे न मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आलीय. हे दोन्ही तरूण नोकरीसाठी एजंटाच्या मदतीने ढाका एअरलाइन्स मार्गे काठमांडूला गेले होते. या दोन्ही तरुणांना भारतात प्रवेश करताच अटक करण्यात आली आहे. आणि त्यानंतर या दोघांना खोरीबारी पोलिस ठाण्याला  सुपूर्द करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार 


 
Top