ट्रेंडिंग

Blog single photo

अदानी विघुत प्रकल्पातील राख घेऊन जाणाऱ्या ट्रकने दोघांना चिरडले

04/05/2019


गोंदिया, 4 मे (हिं.स.)  : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया महामार्गावर तिरोडा येथील अदानी विद्युत निर्मिति प्रकल्पातील गेट नबंर 2 समोर अदानी येथील एश - राख घेऊन निघालेल्या भरधाव ट्रक ने गोंदिया वरुण घोगरा कड़े जाणाऱ्या दुचाकिला धडक दिल्याने 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये निशांत चौरे वय २४ वर्ष व रोहीत गजभिये वय २४ वर्ष दोन्ही रा. घोगरा येथील आहेत, हे दोघेही मित्र गोंदिया वरुन आपल्या स्वगावी परत जात असतांना अदानी येथिल राख घेऊन जात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघांचा चेदामेंदा होत जागीच मृत्यू झाला आहे, या विषयी अदानी प्रकल्पाची बाजु घेन्याची प्रयत्न केले असता त्यानी उडवा उडविची उत्तरे दिली असून तिरोडा येथिल पोलिस निरीक्षक गवते हे तर फोन उचलत नाही, मात्र ट्रक फरार असून पोलिसांनीच ट्रकला पळविण्यासाठी मदत केली असल्या ची चर्चा सद्या परिसरात सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार  
Top