ट्रेंडिंग

Blog single photo

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे 166 जणांचा मृत्यू

27/03/2021

मुंबई, 27 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्रात कोरोना साथरोगाचा प्रकोप सुरू असून शनिवारी 166 जणांचा मृत्यू झालाय. तर राज्यात दिवसभरात 35 हजार 726 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

 राज्यात आजघडीला 3 लाख 3 हजार 475 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून राज्याचा मृत्यूदर 2.2 टक्के आहे. दरम्यान राज्यात आज 24 हजार 523 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 86.58 टक्के झाले आहे. 
हिंदुस्थान समाचार

 
Top