ट्रेंडिंग

Blog single photo

गृहनिर्माण क्षेत्रासाठी 10 हजार कोटींचा निधी मंजूर

06/11/2019

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर (हिं.स.) आर्थिक मंदी सदृष्य स्थितीमुळे सुस्तावलेल्या बांधकाम क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 10 हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

 यासंदर्भात सितारामन म्हणाल्या की, सरकार एक विशेष निधीची निर्मिती करणार आहे. ज्यामध्ये सरकार 10 हजार कोटींचे योगदान देणार आहे. यामध्ये इतरही अनेक संस्थांचा सहभाग असेल त्यामुळे सर्वांचा मिळून हा 25 हजार कोटींचा निधी तयार होईल. यामध्ये एसबीआय आणि एलआयसीचा देखील समावेश असेल. त्यानंतर पुढे आणखी संस्था या निधीसोबत जोडल्या जातील. या निधीद्वारे एका बँक खात्यात पैसे टाकून अपूर्ण गृहप्रकल्पांना मदत केली जाईल. रेरामध्ये जे अपूर्णावस्थेतील प्रकल्प आहेत त्यांना व्यावसायिकदृष्टीने प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मदत दिली जाईल. म्हणजे जर प्रकल्पांचे 30 टक्के काम अपूर्ण असेल तर जोपर्यंत प्रकल्प पूर्ण होत नाही तोवर त्यांना मदत दिली जाईल. कारण, यामुळे लवकरात लवकर घर खरेदीदारांना घर हस्तांतर करता येईल. हा बुडीत प्रकल्प असला तरी त्याला मदत केली जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. 
हिंदुस्थान समाचार


 
Top