अपराध

Blog single photo

धावत्या ट्रकमध्ये झाले स्पार्किंग, लक्षावधी रुपयांच्या बटाट्यांचे नुकसान

16/03/2020

जालना, 16 मार्च (हिं.स.) मध्यप्रदेश येथुन बटाटे घेऊन कर्नाटक येथे जाणारा ट्रक क्र.आर.बी.11- जि.बी.1224 च्या ट्रकच्या वायरींगमध्ये स्पार्क होऊन ट्रकसह बटाटे जळुन खाक होऊन 28 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज  सोमवारी 16 मार्च रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अंबड तालुक्यातील चिंचखेड फाटयाच्या पुढे घडली .

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  ट्रक क्र.आर.बी.11- जि.बी.1224 चा चालक भुपेंद्रसिंग उत्तरसिंग वय 27 वर्ष रा.आफजलपुर ता. बारी जि.धौलपुर राज्य राजस्थान हा त्याच्या ट्रक मध्ये मध्यप्रदेश येथुन बटाटे भरुन कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्हयात जात असतांना अंबड तालुक्यातील चिंचखेड फाटयाच्या पुढे गेल्यावर अचानक ट्रकच्या वायरिंगमध्ये स्पार्क होऊन ट्रकने पेट घेतला. 

त्यामुळे चालकाने ट्रक थांबवुन ट्रकच्या बाहेर निघाला. या झालेल्या स्पार्कींगमध्ये ट्रकसह संपुर्ण बटाटे जळून खाक झाले आहे. यात ट्रकला लागलेल्या आगीमध्ये अंदाजे 25 लाखाचे तर ट्रकमधील असलेल्या बटाटयाचे 3 लाख रुपयाचे असे एकुण 28 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

याप्रकरणी ट्रक चालक भुपेंद्रसिंग उत्तरशिंग वय 27 वर्ष रा.आफजलबुर ता.बारी जि.धौलपुर राज्य राजस्थान यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीसात आकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे
हिंदुस्थान समाचार  
Top