राष्ट्रीय

Blog single photo

राज्यसभा आणि लोकसभा वाहिन्यांचे विलीनीकरण

02/03/2021

नवी दिल्ली2 मार्च  (हिं.स) लोकप्रिय राज्यसभा आणि लोकसभा वाहिन्यांचे
विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन संस्थेस
' संसद टीव्ही  ' असे
नाव देण्यात आले आहे. या  नवीन अभियानासाठी
माजी प्रशासकीय अधिकारी रवी कूपर यांना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात
आले आहे. एक वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत हा कार्यकाळ असेल.डिजिटल माध्यमांच्या वाढत्या गर्दी आणि गोंधळात
राज्यसभा आणि लोकसभा वाहिन्यांचे कार्यक्रम आणि विविध विषयांवर असलेल्या
अभ्यासपूर्ण सादरीकरणास नागरिकांचा गेल्या काही वर्षांपासून विशेषतः सामाजिक
माध्यमांवर मोठा प्रतिसाद लाभतो आहे. नागरिकांना आता लोकप्रिय राज्यसभा आणि लोकसभा
वाहिन्यांचे  संसद टीव्ही  हे नवे रूप अनुभवता येणार आहेहिंदुस्थान समाचार 


 
Top