राष्ट्रीय

Blog single photo

हिंदू धर्म आचार्य सभेच्या डिजिटल कार्यक्रमात डॉ मोहन भागवत, भैयाजी जोशी सहभागी

01/06/2020

नागपूर, 1 जून (हिं.स.) राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे सर-संघचालक डॉ मोहन भागवत  आणि
सर-कार्यवाह भैयाजी जोशी  यांनी नुकतीच
हिंदू धर्म आचार्य सभेद्वारा आयोजित
'ऋषी आणि कृषी :
संस्कृती आणि कोरोनाचे प्रश्न 
' या विषयावर  झालेल्या विशेष परिसंवादात व्हिडिओ
कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला. या डिजिटल कार्यक्रमात बाबा रामदेव
, अवधेशानंद गिरी यांच्यासह  आणि अन्य संत आणि मान्यवरांनी भाग घेतला. 26 एप्रिल रोजी जागतिक कोरोना संकट आणि देशव्यापी संचारबंदीच्या  छायेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी एका विशेष कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधला.   जागतिक कोरोना संकट आणि  प्रदीर्घ देशव्यापी
संचारबंदीच्या काळात संपूर्ण देशभरता राष्ट्रीय
  स्वयंसेवक
संघाच्या मार्फत सेवा कार्य सुरु आहे. समाजात विविध राज्यात आर्थिक विवंचनेत आणि
अन्य कारणांनी  अडकलेल्या नागरिकांना संघाचे स्वयंसेवक
  अखिल भारतीय पाळतीवर युद्ध स्तरावर कार्य करीय आहे. 
कोरोना
संकटाची तीव्रता लक्षात घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एप्रिल ते जून महिन्या
दरम्यान होणा-या जवळपास 90 पेक्षा जास्त
  संघशिक्षा वर्ग 
आणि इतर  सार्वजनिक आणि  सामूहिक कार्यक्रमांना रद्द केले आहे.एप्रिल ते जून या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
प्राथमिक
,
प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष संघ शिक्षा
वर्ग असतात. यात संघाचे सरसंघचालक
, सर-कार्यवाह आणि अन्य
अखिल भारतीय अधिकारी उपस्थित असतात.
 
प्रथम वर्ष प्रांत स्तरावर, द्वितीय वर्ष क्षेत्र
स्तरावर आणि अखिल भारतीय स्तराचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग नागपुरात आयोजित केला
जातो. यापूर्वी
  मार्च  महिन्यात
बंगरुळू येथील वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा देखील कोरोनाच्या
पार्श्व्वभूमीवर रद्द केली होती.
हिंदुस्थान समाचार   


 
Top