ट्रेंडिंग

Blog single photo

निर्भया प्रकरण : दोषींची फाशी नक्की, क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

14/01/2020

नवी दिल्ली, 14 जानेवारी (हिं.स.) : दिल्लीसह देशभर गाजलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झालाय. याप्रकरणातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश यांनी सादर केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
न्या. आर. भानुमती व न्या. अशोक भूषण यांचा समावेश असलेल्या 5 सदस्यीय खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झालाय. 

निर्भया प्रकरणातील अक्षय ठाकूर, विनय शर्मा, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता या चारही दोषींना येत्या 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. गेल्या 7 जानेवारी रोजी दिल्ली न्यायालयाने हा निर्णय देत डेथ वॉरंट जारी केले होते. या डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता या चारही दोषींना फाशी देण्यात येणार असल्याची बाब नमूद करण्यात आली होती. त्यावेळी आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह याचिका दाखल करायची आहे असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार विनय शर्मा आणि मुकेश सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मात्र, मंगळवारी सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या चारही दोषींना निर्धारित दिवशी फाशी दिली जाणार आहे. 
हिंदुस्थान समाचार
 
Top