मनोरंजन

Blog single photo

#प्रभास 20 : दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी दिली महत्वाची माहिती

27/01/2020

हैदराबाद, 27 जानेवारी (हिं.स) 

अभिनेते प्रभास यांच्या आगामी ' #प्रभास20 ' च्या संदर्भात दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ट्विटर द्वारे कुमार म्हणाले, " चित्रीकरणाचा तिसरा भाग नुकताच पूर्ण झाला . " रवींद्र रेड्डी यांचे सेट आणिमनोज परमहंस यांच्या चित्रीकरणाने डोळे दिपून गेले. याशिवाय आपल्या प्रभास आणि पूजा हेगडे यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. " 

 बाहुबली आणि साहोसारखे भरपूर ऍक्शन सीक्वेन्स केल्यानंतर प्रभास एक प्रेमकथा करणार आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या चित्रपटात प्रभास, पूजा हेगडे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाचे जवळपास 36 दिवसांपेक्षा जास्त चित्रीकरण झाले असून बहुतांश चित्रीकरण युरोपमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे साहो दिग्दर्शक सुजीत रेड्डी प्रमाणेच राधा कृष्ण कुमार सुद्धा युवा दिगदर्शक असून ' जिल ' हा एकच चित्रपट यापूर्वी दिग्दर्शित केला आहे. माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ अभिनेते आणि प्रभासचे काका कृष्णम् राजू यांच्या गोपीकृष्ण मुव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची निर्मिती होणार आहे. या चित्रपटात यु व्ही क्रीएक्शन सुद्धा सहभागी होणार आहे. 

  रिबेल स्टार  आणि यंग रिबेल स्टार एकत्र 

 विशेष म्हणजे या चित्रपटात कृष्णम् राजू आणि प्रभास अनेक वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. प्रभास आणि कृष्णम् राजू यांनी ' बिल्ला ' आणि ' रिबेल ' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. याबाबत स्वतः कृष्णम् राजू यांनी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना माहिती दिली. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top