खेल

Blog single photo

न्यूझीलंड वन-डे सामन्यात भारताचा २२ धावांनी पराभव

08/02/2020

ऑकलंड,08 फेब्रुवारी (हिं.स.) : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 22 धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघाने 2 सामन्यांची मालिका देखील गमावली. आघाडी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर रविंद्र जडेजा भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण अशस्वी ठरला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 274 धावांचे आव्हान ठेवले होते. पण भारताचा डाव 251 धावांवर संपुष्ठात आला. न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर विराट कोहली देखील १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर संपूर्ण दौऱ्यात शानदार कामगिरी करणारा केएल राहुल देखील 4 धावांवर बाद झाला. पाठोपाठ केदार जाधव 9 धावांवर माघारी परतला. केदार बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 5 बाद 96 अशी होती. 
 हिंदुस्थान समाचार



 
Top