राष्ट्रीय

Blog single photo

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कोरोना लसीकरण

01/03/2021

नवी दिल्ली, 01 मार्च (हिं.स) : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी कोरोना लसीकरण केंद्रास भेट दिली आणि लसीची
पहिली मात्र घेतली. या संदर्भात ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

"
 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-एम्स दिल्ली येथे कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली.
आपल्या चिकित्सक आणि वैजिनिकांनी ज्याप्रकारे कोरोना युद्धात कार्य केले ते
उल्लेखनीय आहे. माझी सर्वांना विनंती आहे
, जे
नागरिक पात्र आहेत त्यांनी लसीकरण करून घ्यावे. एकत्र आपण भारतास कोरोना मुक्त करू
" देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार पासून सुरु करण्यात आला आहे. केंद्र 
सरकारने 16 जानेवारी पासून  देशातील
आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 
कोरोना   लसीकरण सुरू केले आहे.  पुण्याच्या सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि  हैदराबादच्या 
भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन स्वदेशी
लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिलेली आहे. हिंदुस्थान समाचार


 
Top