अपराध

Blog single photo

भंडारा : आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग , शिक्षकाला अटक

21/03/2020

भंडारा, २१ मार्च (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील प्रगती केंद्रीय निवासी आश्रम शाळेतील एका शिक्षकाने शाळेतील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना उजेडात आलीय. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केलीय. 
यासंदर्भातील माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील  तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या बपेरा येथे अनुसूचित जाती करिता विनाअनुदानित प्रगती निवासी आश्रम शाळा आहे.  याच आश्रम शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकाने तिस-या इयत्तेत  शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केला. पिडीत बालिकेने आपल्या आईला याप्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पिडीतेच्या आईने सिहोरा पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार आरोपी शिक्षकाच्या विरोधात बाल लैंगिग अत्याचार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीय. 
हिंदुस्थान समाचार  
Top