अपराध

Blog single photo

सातारा : अल्पवयीन मोबाईल चोरटा राजवाडा परिसरात जेरबंद

14/01/2020

सातारा,14 जानेवारी,
(हिं.स.) : 
शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मोबाइल
चोरीतील गुन्ह्यातील अल्पवयीन मोबाईल चोरटा सातारा येथील राजवाडा परिसरात जेरबंद
करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने
1 लाख 15 हजार
रुपयांच्या
14 मोबाइलची चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर ते
मोबाईल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरात चार्जिंगला लावलेला 8 हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात इसमाने लंपास केल्याची तक्रार शाहूपुरी
पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना या गुन्ह्यातील
आरोपीला जेरबंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण
शाखेच्या कर्मचार्‍यांचे पथक तयार करून संबंधित संशयित इसमाचा शोध घेण्याच्या
सूचना केल्या होत्या. पथकाने पेट्रोलिंग दरम्यान लक्ष ठेवून तांत्रिक विश्‍लेषण
आधारे माहिती प्राप्त करून त्याचा शोध सुरू केला असता राजवाडा परिसरात मोबाइल चोरी
करणारा संशयित येणार असल्याची माहिती मिळाली.
 या माहितीच्या आधारावर त्याठिकाणी सापळा लावला असता एक संशयित त्या ठिकाणी
आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे
स्पष्ट झाले. तदनंतर त्याच्या नातेवाइकां समक्ष त्याची चौकशी केली असता त्याने
शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाइल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.
त्याला विश्‍वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने
1 लाख 15 हजार रुपयांचे 14 मोबाइल चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून ते हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस
येण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस हवालदार बाजीराव घाडगे करीत आहेत.हिंदुस्थान समाचार


 
Top