अपराध

Blog single photo

गडचिरोली : उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनाला अपघात

27/03/2021

गडचिरोली, 27मार्च (हिं.स.)  : गडचिरोली शहरातील चंद्रपुर मार्गावर असलेल्या कारगील चौकातील रस्ता दुभाजकावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाहन चढुन अपघात झाल्याची घटना आज २७ मार्च रोजी घडली. मात्र अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून एसडीपीओ सह चार जण बाल बाल बचावलेत. 
गडचिरोली येथे ३ दिसापूर्वी नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा हे काही कामानिमित्य आपल्या दोन सुरक्षाकासह एम.एच.३३ सी. ४३६ क्रमांकाच्या सुमो वाहनाने जात असता शहरातील कारगील चौकातील रस्ता दुभाजकावर अचानक वाहन चढल्याने अपघात झाला. यात सुमो वाहन पुर्णतहः पलटी मारलेल्या अवस्थेत होती. मात्र यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून वाहनात असलेले एक चालक, दोन सुरक्षारक्षक व पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना किरकोळ जखम झाली असून अपघातात थोकड्क्यात बचावले. 
अपघातीची माहीती मिळताच  वाहनातील चारही जणांना बाहेर काढून तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाने क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून हलविण्यात आले.
दरम्यान शहरातुन अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. चंद्रपूर मार्गावरील रस्ता बांधकाम झाले असून रस्ता दुभाजक सुध्दा तयार करण्यात आले आहे. मात्र रस्ता दुभाजक हे कमी उंचीचे असल्याने दुभाजकावर वाहन चढण्याचा धोका आहे. याआधी सुध्दा शहरातील रस्ता दुभाजकावर अनेक वाहने चढुन अपघात झाले आहेत तरीसुध्दा नव्याने रस्ता तयार करूनही कमी उंचीचे रस्ता दुभाजक तयार करण्यात आले असुन भविष्यात पुन्हा कोणते वाहन चढेल हे सांगता येत नाही.त्यामुळे रस्ता दुभाजकांची उंचीसुध्दा वाढवणे अपेक्षित आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top