क्षेत्रीय

Blog single photo

शहराच्या चौफेर विकासासोबत तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणार - आडम

08/10/2019

सोलापूर 8 ऑक्टोबर (हिं.स) सत्ताधारी आणि विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला खेडं बनवलं विकासाची फक्त चर्चा होत आहे मात्र कृती होताना दिसत नाही. त्यामुळे म्हणून या हुतात्मा नगरी च्या चौफेर विकासासोबत वाढत्या तरुणांच्या बेरोजगारी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे आवाहन आडम यांनी केले. दत्त नगर येथील माकप  कार्यालय येथे आज, मंगळवारी उमेदवार संपर्क व प्रचार कार्यलयाचे उदघाटन माकप चे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोषात करण्यात आले.

यावेळी आडम म्हणाले की,लोकांची संपत्ती वाढत आहे तर माझ्यावरील गुन्हे वाढत आहेत याचा मला अभिमान आहे. समाज माध्यमावर माझी बदनामी करणारे पोस्ट व्हायरल करीत आहेत.त्यांना माझं खुलं आव्हान आहे आम्ही सत्तेत नसताना ,लोकप्रतिनिधी नसताना जनतेसाठी अहोरात्र झटतो तुम्ही काय करत आहात असा सावलही त्यांनी उपस्थित केला. 
हिंदुस्थान समाचार


 
Top