राष्ट्रीय

Blog single photo

जेएनयु हिंसाचार प्रकरणी आईशी घोषसह 19 जणांवर एफआयआर

07/01/2020

नवी दिल्ली, 07 जानेवारी (हिं.स.) : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) 4 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह 19 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. सर्व्हर रूमची तोडफोड आणि कर्मचा-यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यापीठ प्रशासनाच्या तक्रारीवर हा एफआयआर दाखल करण्यात आलाय.

 जेएनयुमध्ये विद्यार्थी संघटनेने शुल्क वाढीच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनातर्गत सबमिशन्स परीक्षांवर बहिष्काराचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर 4 जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सर्व्हर रूमची तोडफोड करण्यात आली होती. ही तोडफोड विद्यार्थी संघाच्या पदाधिका-यांनी केल्याची माहिती पुढे आलीय. याप्रकरणी 5 जानेवारी रोजी विद्यापीठ प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी आईशी सह 19 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल केलाय. 
हिंदुस्थान समाचार 
Top