अंतरराष्ट्रीय

Blog single photo

सऊदी- भारत यांच्यात 12 मोठे करार होणार

28/10/2019

रियाद, 28 ऑक्टोबर (हिं.स.) : सऊदी अरेबिया आणि भारत यांच्यात तब्बल 12 विविध करार होणार आहेत. सऊदी अरेबियाची राजधानी रियाद येथे 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजित तिस-या “फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह” (एफआयआय) मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रियाद येथे पोहचले आहेत. एफआयआयमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजित या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अनेक मोठ्या उद्योगपतींनी भेटतील. त्यांच्यासोबत ते काश्मीरमध्ये व्यवसाय वाढण्यासाठी चर्चा करण्याची शक्यता आहे. 

पंतप्रधान मोदी या दौऱ्यात ऊर्जा, संरक्षण, नागरिक विमान सारख्या मुद्द्यांवर करार करतील. दोन्ही देशांमध्ये 12 वेगवेगळे करार होणार आहेत. भारताना 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मिरातून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने इस्लामिक देशांकडून समर्थन मागितले होते. जम्मू-काश्मीरला धार्मिक रंग देण्याचा इम्रान खान यांचा प्रयत्न होता. परंतु, त्यावेळी सऊदी अरेबियाने याला भारताचा अंतर्गत मुद्दा म्हंटले होते. त्यामुळे पाकिस्तानला चांगलाच झटका बसला होता. दरम्यान मोदींच्या या यात्रेत खोडा घालण्यासाठी पाकिस्तानने कुरापती करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदीला जाण्यासाठी पाकिस्नानं हवाई हद्द वापरण्यास इन्कार केलाय. भारताकडून पाकिस्तानची हवाई हद्द वापरू देण्याबाबत परवानगी मागण्यात आली होती. मात्र पाकिस्ताननं त्याला मनाई केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी याबाबत माहिती दिली. आता भारत इंटरनॅशनल सिव्हिल एव्हीएशन ऑर्गनायझेशनमध्ये पाकिस्तानविरोधात दाद मागणार आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top