अंतरराष्ट्रीय

Blog single photo

तालिबानने अमेरिकेशी झालेला शांतता करार मोडला

02/03/2020

काबूल, 02 मार्च (हिं.स.) : अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठा धक्का देणारी बातमी आहे. अमेरिकेशी झालेला शांतता करार पाळणार नसल्याचे तालिबानच्या प्रवक्त्याने जाहीर केले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये शनिवारी 29 फेब्रुवारी रोजी कतारची राजधानी दोहा येथे हा करार झाला होता. 

 या करारानुसार तालिबान हिंसक कारवाया थांबवून शांततेसाठी तरतूद करण्यात आली होती. तर अमेरिकेनेही आपलं सैन्य परत बोलावण्याची ग्वाही दिली होती. परंतु, अवघ्या दोन दिवासत हा करार तालिबानने मोडित काढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणान तालिबानसोबतच्या शांतता करारावर समाधान व्यक्त करतानाच इशाराही दिला होता. कराराची अंमलबजावणी करताना काही गडबड केली तर अफगाणिस्तानमध्ये अमेरिका एवढे सैन्य पाठवेन की कुणी त्याचा विचारही केला नसेल, अशा शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिला होता. परंतु, तालिबानने आता हा करारच मोडीत काढला आहे. 
हिंदुस्थान समाचार


 
Top