मनोरंजन

Blog single photo

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत चंद्रपूरच्या ‘ध्यानीमनी’ ने मारली बाजी

23/09/2019

नागपूर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह, अमरावती येथे पार पडलेल्या दोन दिवसीय आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाने सादर केलेल्या ‘ध्यानीमनी’ या नाटकाने बाजी मारत स्पर्धेतील सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह दिग्दर्शन, महिला गटातील अभिनय, नेपथ्थ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगित या वर्गवरीतील प्रथम आणि पुरुष गटातील अभिनय व रंगभूषा-वेशभूषा या वर्गवारीतील व्दितीय पुरस्कारही पटकाविले तर, अमरावती परिमंडळाच्या ‘एका ब्लॉकची गोष्ट’ या नाटकाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.


स्पर्धेतील विजेत्यांना नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी कलाकारांना प्रोत्साहित करतांना दिलीप घुगल म्हणाले की, ज्याप्रमाणे ग्राहकांना सेवा देतांना महावितरण कर्मचारी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचेसोबतच जिव्हाळाही जपतात, त्याचप्रमाणे महावितरणमधील कलावंतांनी आपल्या कलागुणांनाही जोपावे, कारण जे लोक कला जपतात ते दिर्घ आयुष्यी आणि समाधानी राहत आपले आयुष्य सुकर करतात. ज्यांना या स्पर्धेत पारितोषिक मिळाले नाही त्यांनी निराश न होता पुन्हा जोमाने प्रयत्न करावा असे आवाहन नाटयस्पर्धा आयोजन समीतीच्या स्वागताध्यक्षा सुचित्रा गुजर यांनी यावेळी केले. 

 एकूण दोन दिवस चाललेया या नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळातर्फ़े आनंद नाडकर्णी लिखित ‘त्या तीघांची गोष्ट’, गोंदीया परिमंडळातर्फ़े सलीम शेख लिखित ‘फ़तवा’ अकोला परिमंडलातर्फ़े चंद्रकांत शिंदे लिखित ‘जननी जन्मभुमिश्च’ चंद्रपूर परिमंडळातर्फ़े प्रशांत दळवी लिखित ‘ध्यानीमनी’ अमरावती परिमंडलातर्फ़े हेमंत एदलाबादकर लिखित ‘एका ब्लॉकची गोष्ट’ ही नाटके सादर करण्यात आली. 

अमरावती परिमंडळाने सादर केलेल्या ‘एका ब्लॉकची गोष्ट’ या नाटकात नाना ची भूमिका करणाऱ्या अभिजीत सदावर्ती यानी सलग तीसऱ्या वर्षी पुरूष गटातून सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पटकावले आहे तर स्त्री गटातून चंद्रपूर परिमंडलाच्या ‘ध्यानीमनी’ मधील शालीनी म्हणजेच रोहिणी ठाकरे यांनी आपल्या कलागुणांची असीम छाप सोडत महिला गटातून उत्कृष्ठ अभिनयाचा मान पटकाविला तर नागपूर परिमंडलाने सादर केलेल्या ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकातील नेहा हेमने यांना महिला गटातून उत्कृष्ट अभिनयासाठीचा दुसरा क्रमांक मिळाला, याच नाटकातील स्नेहांजली तुंबडे पानसे यांना अभिनयासाठीचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ‘ध्यानीमनी’ चे दिग्दर्शक अनिल बोरसे यांना मिळाले आहे. ‘एका ब्लॉकची गोष्ट’ मधील कुमारी अव्दिका कडू यांनी बालकलाकारांच्या भूमिकेतून नाटय प्रेक्षकांची मने जिंकल्याने त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकही यावेळी देण्यात आले.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राअंतर्गत पार पडलेल्या या स्पर्धेकरीता अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडळातील सर्व वरीष्ठ अधिकारी व नाटयरसिकांची मांदीआळी उपस्थित होती. 
हिंदुस्थान समाचार


 
Top