राष्ट्रीय

Blog single photo

अंमली पदार्थ मुक्त भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

13/02/2020

नवी
दिल्ली
13 फेब्रुवारी  (हिं.स.) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बिम्स्टेक सदस्य देशांसाठी आयोजित
अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेचे 
उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना शाह म्हणाले की
, भारत सरकार अंमली पदार्थ तस्करी आणि कथित व्यापार
यावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य दिशेनी मार्गक्रमण करीत असून त्यासाठी योग्य नीती
आणि विविध संघटनांमध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम करेल.
 शहा पुढे म्हणाले की, अंमली पदार्थ तस्करी आणि कथित व्यापार कधीच सहन न करण्याची भूमिका भारताने
घेतली असून असे प्रकार थांबविण्यासाठी कटिबद्ध आहे.  शाह म्हणाले
, "अंमली पदार्थ मुक्त भारत पंतप्रधान
नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे
."संयुक्‍त राष्‍ट्र संघाच्या  वैश्विक
अहवालाचा उल्लेख करताना शाह म्हणाले की
, संपूर्ण जगात 15 ते 64 वर्ष या वयातील साडे पाच टक्के लोक अंमली पदार्थ सेवन करतात ही गंभीर बाब
आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रतिबंध परिषदेविषयी विचार व्यक्त करताना गृहमंत्री
म्हणाले की
, दोन दिवसाच्या ह्या संमेलनात या विषयावर व्यापक चर्चा होऊन साकारात्मक आणि ठोस
निर्णय घेतले जातील
.  2018 मध्ये काठमांडू येथे
झालेल्या चौथ्या बिम्स्टेक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या
प्रतिबद्धतेनुसार अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग या परिषदेचे आयोजन केले.
आशियाई देशांना अमली
पदार्थांच्या तस्करीचा मोठा फटका बसत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी दक्षिण
आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यातील दुवा असलेला बिम्स्टेक सदस्य मंच यासाठी
प्रभावी मंच आहे .बांगलादेश
, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड
आणि भारत हे बंगालच्या उपसागरातले आणि लगतच्या सात देश बिम्स्टेकचे सदस्य आहेत.हिंदुस्थान समाचार


 
Top