राष्ट्रीय

Blog single photo

राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी जगत प्रकाश नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव सादर

20/01/2020

 नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गृहमंत्री आणि आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात नवीन अध्यक्ष पदासाठी राज्यसभा सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव सोमवारी सादर करण्यात आला. याप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रल्हाद जोशी, प्रकाश जावडेकर, मुख्तार अब्बास नकवी, थावरचंद गेहलोत,गिरीराज सिंह, राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, रावसाहेब दानवे, हरदीप सिंह पुरी, प्रल्हाद पटेल, जितेंद्र सिंह तसेच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भूपेंद्र यादव प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी एकमताने जगत प्रकाश नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव निवडणूक प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री, खासदार राधा मोहन सिंह यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी विविध राज्यातील प्रदेश अध्यक्ष सुद्धा उपस्थित राहिले. 

2019 निवडणुकीत ज्वलंत विजय मिळवल्यानंतर अमित शाह केंद्रीय गृह मंत्री झाले. त्यानंतर जून महिन्यात जगत प्रकाश नड्डा यांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जे. पी नड्डा यांनी आरोग्य मंत्री म्ह्णून काम पहिले तसेच ' आयुष्मान भारत योजना ' ही त्यांच्याच कारकिर्दीत सुरु करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत जे.पी नड्डा यांच्याकडे उत्तर प्रदेश राज्याची जबाबदारी होती. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top