खेल

Blog single photo

नागपुरात शुक्रवारपासून महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धां

14/01/2020

नागपूर, 14 जानेवारी (हिं.स.) : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 17 ते 19 जानेवारी या दरम्यान नागपूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत महावितरणच्या राज्यातील सर्व 16 परिमंडलातील 1064 अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. यात 376 महिला तर 688 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. सर्वसाधारण विजेतेपद निश्चित करताना या वर्षी प्रथमच महिला खेळाडुंच्याही वैयक्तिक आणि सांघिक गुणांची नोंद घेतली जाणार आहे.


महावितरण मधील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी दरवर्षी आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. 2019-20 यावर्षाकरिता या स्पर्धेचे यजमानपद नागपूर परिमंडलाकडे आहे.स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 2020 ला सकाळी नऊ वाजता रवी नगर येथिल नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदानावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या हस्ते होणार आहे. 
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ रविवार 19 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्याच मैदानावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (संचालन) दिनेशचन्द्र साबू, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (वित्त) श्री जयकुमार श्रीनिवासन, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर पवनकुमार गंजू
इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 
हिंदुस्थान समाचार


 
Top