ट्रेंडिंग

Blog single photo

सार्वजनिक जागा आंदोलनासाठी बंद केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

10/02/2020

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी (हिं.स.) : देशातील कुठलीही सार्वजनिक जागा निदर्शने किंवा आंदोलनासाठी बंद केली जाऊ शकत नसल्याची महत्त्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने सोमवारी (10 फेब्रुवारी रोजी) शाहीन बाग प्रकरणावरील सुनावणीदरम्यान केली आहे. 

शाहीन बाग येथे गेल्या दोन महिन्यांपासून सुधारीत नागरिकत्त्व कायद्याच्या विरोधात (सीएए) आंदोलन सुरू आहे.
 शाहीन बाग प्रकरणावरील आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने कोणतेगी अंतरिम आदेश दिले नाहीत. आता या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 फेब्रुवारीला होणार आहे. 
 हिंदुस्थान समाचार 
Top