मनोरंजन

Blog single photo

२६/११ वर आधारित ‘मेजर’चा टीझर 12 एप्रिलला होणार प्रदर्शित, सई मांजरेकरचा फर्स्ट लूक व्हायरल

04/04/2021

2 जुलैला चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई, ०४ एप्रिल, (हिं.स.) : 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. ‘मेजर’ या चित्रपटात अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील सईचा फर्स्ट लूक समोर आला आहे. सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. यात ती शाळेच्या गणवेशात अभिनेता अदिवि शेषच्या शेजारी बसली असून यात ती अदिविकडे प्रेमाने पाहत असल्याचे दिसत आहे.

‘मेजर’ चित्रपटात मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि त्यांची प्रेयसी असलेल्या ईशाची प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात साउथ अभिनेता अदिवि शेष मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘मेजर’ चित्रपटाचा टीझर 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. तर, 2 जुलैला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच सोभिता धूलिपाला आणि प्रकाश राज हे कलाकारदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहेत. ‘मेजर’ चित्रपट हिंदीसोबतच तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनसाठी सईने तेलगू भाषेचे धडे घेतले आहे.

हिंदुस्थान समाचार


 
Top