अपराध

Blog single photo

दोन जुगार अड्यांवर धाड, 16 जणांना अटक

14/01/2020

अकोला, १४ जानेवारी (हिं.स.) अकोला जिल्ह्यातील
रौंदाळा आणि तेल्हारा अशा दोन ठिकाणी मंगळवारी  पोलिसांनी धाड टाकून तेथे सुरू असलेल्या अवैध
जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकून १६ आरोपींना अटक केली. तसेच सुमारे ६९ हजार
रुपयांचे साहित्य जप्त केले.यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार दोन ठिकाणी अवैध जुगार सुरू
असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रौंदाळा येथील जुगार
अड्यावर धाड टाकली. यावेळी  बापूराव अबगड
, दिपक भोजने,  रमेश सपकाळ,  उमेश दिवनाले,
जयंता गणोजी तायडे
, वसंता
आठवले, नंदपाल वानखडे
, साहेबराव
आठवले
, उमेश
ओकार मोरे
, ज्ञानेश्वर
विठठल ढोणे
, संदीप
काशीराव सिरसाट
, सुर्यभान
पुंडलीकराव माठे यांना ताब्यात घेण्यात आले.तसेच तेल्हारा शहरातील मानकर चौक येथे टाकलेल्या धाडीत अमोल
जनार्दन डांगे
, अमोल
बाबूराव शंकर ओकार पोटे
, विकास
विश्वनाथ कुईटे, सुनिल रघुनाथ खापरकर यांना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही ठिकाणाहून
नगदी
,मोबाईल ,मोटर सायकल व वरली जुगार साहीत्य असे एकुण ६९,३३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात
आला. हे दोन्ही जुगार ड्डे चालवणारे गजानन सरोदे आणि गजानन पाटील यांच्या विरोधात कलम
१२ महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम १०९ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला
आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top