मनोरंजन

Blog single photo

सुपरस्टार रजनीकांत यांना 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार

01/04/2021
नवी दिल्ली1 एप्रिल (हिं.स)प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  प्रथितयश बहुभाषी अभिनेते आणि
बहुमुखी कलाकार  सुपरस्टार  रजनीकांत यांना
2019  वर्षाचा 51 वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
करण्यात आला. या संदर्भात अधिकृत घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी
 गुरुवारी ट्वीटरद्वारे केली.प्रकाश जावडेकर म्हणाले " अत्यंत आनंदाची बाब आहे की, यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपट सृष्टीतील
एक महान अभिनेते  रजनीकांत जी यांना प्रदान
करण्यात येत आहे.  अभिनेता
, निर्माता आणि पटकथाकार म्हणून  सुपरस्टार 
रजनीकांत यांचे योगदान मोठे आणि भव्य आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार  समिती सदस्य 
आशा भोसले
, सुभाष घई, मोहनलाल, शंकर महादेवन आणि बिश्वजीत चॅटर्जी यांचे धन्यवाद."12
डिसेंबर 1950 साली रजनीकांत यांचा जन्म बंगळूरू येथे एका मराठी कुटुंबात झाला.
चित्रपटात येण्यापूर्वी शिवाजी राव गायकवाड यांनी कुटुंबास आर्थिक सहकार्य
करण्यासाठी बस कंडक्टर, कार्पेंटर आणि अन्य अनेक कामे केलीत. शिवाजी राव गायकवाड
पासून सुपरस्टार रजनीकांत हा प्रवास एखाद्या अद्भुत चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी
नाही. बंगळूरू मध्ये  कर्नाटक परिवहन
मंडळात बस कंडक्टर म्हणून कार्यरत असताना शिवाजी राव गायकवाड यांनी नाटकात काम
करण्याची आवड जोपासायला सुरवात केली. त्यांनी अनेक कन्नड नाटकांमध्ये काम केले.
त्यानंतर मित्रांच्या प्रोत्साहनाने ते चेन्नईत चित्रपटाच्या शिक्षणासाठी गेले.शिवाजी राव गायकवाड यांना  पुट्ट्णा कानगल यांच्या कथा संगमा या कन्नड
चित्रपटाद्वारे पहिली संधी प्राप्त झाली. त्यानंतर प्रथितयश दिग्दर्शक के बालचंदर
यांनी  शिवाजी राव गायकवाड यांच्यातील
क्षमता ओळखत तमिळ शिकण्याचा सल्ला दिला तसेच
1975 साली अपूर्व रागंगल चित्रपटात एका कर्करोग
ग्रस्त मनुष्याची भूमिका बजाविली. त्या चित्रपटाचे नायक कमल हसन आणि रजनीकांत
पुढील काळात अत्यंत घनिष्ठ मित्र झाले. अपूर्व रागंगल चित्रपटानंतर शिवाजी राव
गायकवाड यांचे रुपांतर रजनीकांत असे झाले आणि त्यांनतर जे झाले तो इतिहास आहे.आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत
रजनीकांत-थलैवा यांनी
 कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी, मल्याळम
सहित बंगाली आणि इंग्रजी चित्रपटातही काम केले.
170 पेक्षा
जास्त
  चित्रपटात काम करून नागरिकांच्या मनावर
अधिराज्य गाजविणा-या सुपरस्टार रजनीकांत यांना पद्म भूषण आणि पद्म विभूषण
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बहुभाषा कोविद रजनीकांत यांना मराठी,
कन्नड, तमिळ, तेलुगु, आणि इंग्रजीची उत्तम जाण आहे.मागील वर्षी 9 जानेवारीला सुपरस्टार रजनीकांत यांचा 'दरबार ' चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दरबार नंतर सुपरस्टार
रजनीकांत दिग्दर्शक  शिवा  यांच्यासोबत काम करणार आहे.  अन्नात्थे या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर
करणार आहे. याचित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत अनेक वर्षांनी अभिनेत्री मीना आणि
खशबू सुंदर काम करणार आहेत. अन्नात्थे चित्रपटाचे चित्रीकरण  सुरु झाले आहे.
आरोग्य कारणामुळे रजनीकांत यांनी
सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय मागे घेतला आहे.हिंदुस्थान समाचार


 
Top