राष्ट्रीय

Blog single photo

भाविकांसाठी 1 जुलैपासून खुले होणार कामाख्या मंदिर

01/06/2020

गुवाहाटी, 01 (हि.स.) : कोरोना साथरोगामुळे गेल्या 70 दिवसांपासून बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळे आता केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुन्हा सुरू होताहेत. नव्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टारंट आणि तीर्थ स्थानातील धर्मस्थळे सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. देशातील सर्व धर्मस्थळे 8 जून पासून सुरू होणार असली तरी आसामच्या गुवाहटी येथील निलाचल पर्वतावरील कामाख्या शक्तीपीठ येत्या 30 जून पर्यंत बंदच राहणार आहे. हे शक्तीपीठ आगामी 1 जुलै पासून सुरू करण्याचा निर्णय देवालय समितीने घेतला आहे. 

मंदिर प्रशासन समितीने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कामाख्या मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. कामाख्या मंदिरात दरवर्षी अंबुवासी मेळा आयोजित केला जातो. यात सुमारे 10 लाख भाविक हजेरी लावतात. यंदा 21 ते 26 जून दरम्यान अंबुवासी मेळा होणार आहे. त्यामुळे यात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता देवालय समितीने 30 जून पर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

हिंदुस्थान समाचार


 
Top