अपराध

Blog single photo

बीड : ट्रॅक्टर मोटारसायकलच्या अपघातात दोघांचा मृत्यू

02/06/2020

बीड, 02 जून (हिं.स.)  ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या अपघातात दोन जण ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि.१ रोजी रात्री दहाच्या सुमारास गेवराई तालुक्यातील कोळगाव या गावाजवळ घडली.
गेवराई तालुक्यातील पोखरी जनार्धन मोघे, भारत मोघे व अन्य एक असे तिघे मोटारसायकल वरून जात असताना सोमवार 1 जून रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील कोळगाव गावाजवळ आले असता त्यांची मोटारसायकल ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्यांने त्यांचा मोटारसायकल वरील ताबा सुटला व ते तिघेही रस्त्यावर जोरात आदळल्याने त्यांना जोराचा मार लागला. 
याअपघातात जनार्धन मोघे, भारत मोघे यांना जोराचा मार लागल्याने त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावरही बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार


 
Top