राष्ट्रीय

Blog single photo

बिहार : खासगी रुग्णालयातही कोरोना लस निःशुल्क देणार – नितीश कुमार

01/03/2021

पाटणा, 01 मार्च (हिं.स.) : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारी प्रारंभ झाला. यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बिहार सरकारने यासंरदर्भात मोठी घोषणा केली आहे. बिहारमध्ये खासगी रुग्णालयात देखील करोनाची लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. 

 यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलेल्या घोषणेनुसार बिहारमध्ये करोनाची लस पूर्णपणे मोफत दिली जाईल. खासगी रुग्णालयांमध्ये देखील मोफत करोना लसीकरणाची सेवा उपलब्ध करून दिली जाईल. याचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून उचलला जाणार असल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले. बिहारमधील निवडणुकांवेळी अशा प्रकारचं आश्वासन देखील नितीश कुमार यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, ‘देशात सर्व सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांवर सरकारने ठरवलेल्या टप्प्यांनुसार मोफत लसीकरण केलं जाईल. त्यासोबतच आता खासगी रुग्णालयांना देखील लसीकरणाची परवानगी असेल. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये घेतल्या जाणाऱ्या लशीसाठी 250 रुपये मोजावे लागतील. यामध्ये 100 रुपये सेवाशुल्क आणि 150 रुपये लसीचे शुल्क यांचा समावेश असेल’, असे जाहीर करण्यात आलेय. 
हिंदुस्थान समाचार


 
Top