क्षेत्रीय

Blog single photo

सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दुसऱ्यांदा कोरोना

23/02/2021

सोलापूर 23 फेब्रुवारी (हिं.स)  : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. यापूर्वीही शंभरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. 

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी 19 फेब्रुवारी रोजी  आढावा बैठक बोलविली होती. मात्र बैठकीपुर्वीच त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना बैठक घेण्याचे सांगितले. जास्त त्रास होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लक्षणे दिसत असल्याने जिल्हाधिकारी शंभरकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर सध्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती ठीक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांनी सांगितले. 
हिंदुस्थान समाचार. 


 
Top