मनोरंजन

Blog single photo

' वकील सहाब ' चे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित

03/03/2020

हैदराबाद , 3 मार्च (हिं.स.) : अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या आगामी वकील सहाब चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले जाणार आहे. ' पावर स्टार ' नावाने प्रसिद्ध असलेले पवन कल्याण अभिताभ बच्चन- तापसी पन्नू यांच्या पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपट पिंक च्या तेलुगू भागात काम करीत आहेत.
तेलुगू भागाची निर्मिती सुप्रसिद्ध निर्माते  बोनी कपूर आणि दिल राजू करणार असून दिग्दर्शन वेणू श्रीराम करणार आहेत. 2018 साली पवन कल्याण अज्ञातवासी या त्रिविक्रम श्रीनिवास यांच्या चित्रपटात दिसले होते. जवळपास 2 वर्षानंतर पवन कल्याण रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. 

महिलांच्या प्रश्नावर सामाजिक भाष्य करणाऱ्या पिंक चे दिग्दर्शन अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी केले होते. अभिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती.
गब्बर सिंह या चित्रपटांनंतर पवन कल्याण आणि दिग्दर्शक हरीश शंकर पुन्हा एकदा एकत्र आले आहे. #पीएसपीके28 असे तात्पुरते नाव देण्यात आलेल्या चित्रपटाची निर्मिती मायथ्री मुव्ही मेकर्स करणार आहेत. त्याच प्रमाणे दिग्दर्शक क्रिश आणि पवन कल्याण सोबत काम करणार आहेत. 

बोनी कपूर यांनी पिंक चित्रपटाची निर्मिती तामिळ भाषेतही केली आहे. सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते अजित कुमार यांनी ' नेरकोंडा पारवै ' या चित्रपटात अभिताभ बच्चन यांची भूमिका बजाविली. चित्रपटात तापसीने वठवलेलया भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा श्रीनाथ तामिळ भाषेत काम केले. या चित्रपटासह बोनी कपूर तामिळ चित्र-सृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले असून संगीत युवान शंकर राजा यांनी दिले . 

हिंदुस्थान समाचार


 
Top