मनोरंजन

Blog single photo

सैरा ला मिळाले ' यु / ए ' प्रमाणपत्र

24/09/2019

सैरा ला मिळाले ' यु / ए ' प्रमाणपत्र 

 हैदराबाद, 24 सप्टेंबर, (हिं.स) 

मेगास्टार चिरंजीवी यांच्या ' सै रा नरसिंह रेड्डी ' या चित्रपटाच्या प्रदर्शनास अवघे काही दिवस बाकी आहेत. दोन वर्षानंतर मेगास्टार चिरंजीवी यांनी रुपेरी पडद्यावर बघण्यासाठी ' मेगा फॅन्स ' आतुर आहे. चित्रपटाच्या निर्मिती चमूने नुकतीच सेन्सर प्रक्रिया पूर्ण केली असून सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन द्वारे सै रा ला ' यु / ए ' प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबाबत अधिकृत घोषणा कोनिडेला निर्मिती संस्थेने ट्विटर द्वारे केली आहे. 

 ' सै रा नरसिंह रेड्डी’   चित्रपटातून   आद्य क्रांतिकारी उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांपुढे मांडली जाणार आहे. उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला होता. विशेष म्हणजे 1857 च्या उठवापूर्वीच 1846 साली नरसिंह रेड्डी यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. परंतु इतिहासाने याची कधीच दखल घेतली नाही. 

 सै रा मेगास्टार चिरंजीवी यांचा 151 चित्रपट असून या भव्य चित्रपाटात तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे.  चित्रपटात चिरंजीवी, अभिताभ बच्चन,   अभिनेत्री नयनतारा, किच्चा सुदीप, विजय सेतुपती, जगपती बाबु, तमन्ना भाटिया, रवी किशन सहित अनेक मोठमोठे कलाकार सामिल आहेत. 

 सैरा 2 ऑक्टोबर रोजी 5 भाषांमध्ये एकच वेळी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून निर्मिती अभिनेते आणि चिरंजीवी यांचे पुत्र राम चरण यांनी कोनिडेला निर्मिती संस्थेच्या अंतर्गत केली आहे. हिंदी प्रदर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्म्सने घेतली आहे. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top