खेल

Blog single photo

महिला कुस्तीपटूंच्या रंगतदार कुस्त्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप

26/09/2019

अहमदनगर, 26 सप्टेंबर (हिं.स.):- वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिका आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप मुलींच्या कुस्त्यांनी झाला.दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत शालेय कुस्तीपटूंचा उत्सफुर्त सहभाग लाभला.विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी मैदान गाजविले.


मुलींच्या कुस्तीं स्पर्धेचा प्रारंभ राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे हिच्या हस्ते कुस्ती लावून करण्यात आला.यावेळी उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले,जिल्हा तालिम संघाचे खजिनदार नाना डोंगरे,दिगंबर वाघ, आनंदा खराडे,एकनाथ होले, कैलास करपे,प्रशांत सुरसे,सचिन गोमटे,आचार्य ,सहदेव गव्हाणे,समीर पटेल,भाऊसाहेब करंजुले,गणेश जाधव,बाजीराव वाबळे,सतीश टकले,दादासाहेब कोल्हे,प्रा.गोबरे,दत्ता वाबळे,सुधाकर सुंबे,सुनि ल भवर आदींसह शालेय शिक्षक व महिला कुस्तीपटू उपस्थित होत्या.
जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिका आयोजित शालेय कुस्ती स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी मुलींचा कुस्तीचा थरार रंगला होता.मुलींनी एकापेक्षा एक सरस डावपेचांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले.


हिंदुस्थान समाचार  


 
Top