राष्ट्रीय

Blog single photo

झटपट मिळणार पॅनकार्ड

05/11/2019

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर (हिं.स.) : पॅनकार्ड अपेडेट करण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पॅन कार्ड मिळवणं आता अधिक सोपे होणार आहे. अर्ज केल्याच्या काही मिनिटांमध्येच पॅन कार्ड ग्राहकांच्या हातात मिळेल. आयकर विभाग लवकरच पॅनकार्ड बनविण्यासाठी नवी सेवा लाँच करण्याच्या तयारीत आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ही नवी सेवा सुरू होईल. या नव्या सेवेचा फायदा अर्जदारासोबतच ज्यांचं पॅन कार्ड हरवलेय किंवा डुप्लिकेट पॅनकार्डसाठी ज्यांनी अर्ज केलाय त्यांनाही होईल.
इलेक्ट्रॉनिक पॅन अर्थात ई-पॅन सुविधा सर्व अर्जदारांसाठी मोफत असेल. ई-पॅन तयार करताना आधार कार्डवरील माहिती पडताळली जाईल, त्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर आधारवरील नाव, जन्मदिनांक, वडिलांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती ऑनलाइन अॅक्सेस केली जाईल. पॅनकार्ड तयार करण्यासाठी ठराविक माहिती वगळता कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसेल. एकदा पॅन जनरेट झाल्यानंतर अर्जदाराला एक डिजिटल स्वाक्षरी असलेले ई-पॅन दिले जाईल. यामध्ये एक क्युआर कोड असेल. फसवणूकीला आळा घालण्यासाठी क्यूआर कोडमध्ये माहिती इनक्रिप्ट केली जाईल. एका पायलट प्रोजेक्टअंतर्गत 8 दिवसांत 62 हजारांहून अधिक ई-पॅन जारी करण्यात आले आहेत. लवकरच देशभरात हा प्रोजेक्ट सुरू करण्यात येईल. प्राप्तिकराच्या सेवा डिजिटल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार


 
Top