मनोरंजन

Blog single photo

जयललितांवरील 'थलैवी' चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार

25/02/2021

चेन्नई,  20 फेब्रुवारी  (हिं.स) तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकच्या जेष्ठ नेत्या जे जयललिता यांच्या 73 व्या  जयंती निमित्त अभिनेत्री कंगना राणावत यांच्या आगामी  थलैवी  चित्रपटाची प्रदर्शन तारीख घोषित करण्यात आली.  23  एप्रिलला थलैवी  हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 
' थलैवी ' या  जयललिता यांच्या जीवनपटाचे लेखन सुप्रसिद्ध लेखक आणि बाहुबली चित्रपटाचे  जनक व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी केले असून दिग्दर्शन ए एल विजय यांनी  केले आहे. या महत्वपूर्ण चित्रपटासाठी कंगना भरपूर मेहनत घेत आहेत. कंगना यांनी  तामिळ भाषचे तसेच भरतनाट्यमचे विशेष प्रशिक्षण घेतल्याचे समजते.   चित्रपटाची निर्मिती  विष्णू इंदुरी यांच्या विबेरी तसेच आणि शैलेश आर सिंह यांच्या कर्मा मीडिया अँड एंटरप्राइजेस च्या संयुक्त विद्यमाने केली आहे.
जानेवारी महिन्यात  जेष्ठ अभिनेते, अण्णाद्रमुकचे संस्थापक आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न  पुरतचि तलइवर एम जी रामचंद्रन उर्फ एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त  थलैवी ' चित्रपटातील एम जी रामचंद्रन उर्फ एमजीआर म्हणजे अभिनेते अरविंद स्वामी यांची नवीन झलक ट्वीटरद्वारे प्रदर्शित करण्यात आली.  तमिळ चित्रपटात अनेक वर्ष रुपेरी पडदा गाजविणारे एमजीआर आणि जयललिता यांच्या बहुचर्चित जोडीची झलक दाखविण्यात आली.
चित्रपटतात माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ अभिनेते एम जी रामचंद्रन  म्हणजेच एमजीआर यांच्या भूमिकेत सुविख्यात बहुभाषी  अभिनेते अरविंद स्वामी दिसणार आहेत.जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत कंगना राणावत यांच्या  आगामी बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुभाषी  ' थलैवी ' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता निर्मितीनंतरचे उर्वरित कार्य सरू आहे .
 हिंदुस्थान समाचार


 
Top