अपराध

Blog single photo

अकोल्यात दि बर्निंग ट्रॅव्हल्स चा थरार, मोठी दुर्घटना टळली

01/06/2020

अकोला, १ जून(हिं.स.)अकोल्यातील आयकर भावना समोर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूला उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्स पैकी एका ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला यामध्ये ट्रॅव्हल्स जळून खास झाली. 


यासंदर्भातील माहितीनुसार स्थानिक आयकर भवनसमोर असलेल्या एका पेट्रोल पंपाचे मागच्या बाजूला दोन ट्रॅव्हल्स उभ्या होत्या त्यातील एका ट्रॅव्हल्सने सोमवारी अचानक पेट घेतल्याने या परिसरात काही काळ खळबळ उडाली होती विशेष म्हणजे याचा ट्रॅव्हल्स समोर बसलेल्या एका दुसऱ्या ट्रॅव्हल्सलाही आगीच्या झळा लागत असल्याने उपस्थित नागरिकांनी ट्रॅव्हल्स समोर ढकलत नेली.  घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे एक वाहन घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र हे घटना घडल्यानंतर जर या आगीचे लॉट पेट्रोल पंप पर्यंत पोचले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. 

हिंदुस्थान समाचार


 
Top