मनोरंजन

Blog single photo

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर काळाच्या पडद्याआड

09/02/2021

मुंबई, 09 फेब्रुवारी,
(हिं.स) : दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचे भाऊ व अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी  हृदयविकाराच्या
झटक्याने मुंबई येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 58 वर्षांचे होते. सकाळच्या सुमारास
राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना चेंबूरमधील इंलॅक्स
रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनी ही माहिती दिली.
 



राजीव कपूर यांच्या निधनाबद्दल माहिती देताना रणधीर कपूर
म्हणाले की,
'आज मी माझा छोटा भाऊ गमावला. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे
प्रयत्न केले. मात्र, ते त्याचे प्राण वाचवू शकले नाही.
राजीव कपूर यांचे राम तेरी गंगा मैली, एक जान हैं हम’, ‘राम तेली गंगा मैली’, ‘आसमान’, ‘लवर बॉय’, ‘जबरदस्त’, ‘हम तो
चले परदेस
हे चित्रपट गाजले होते. 



हिंदुस्थान समाचार



 


 
Top