अपराध

Blog single photo

सावंतवाडीत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई

25/03/2021

सिंधदुर्ग, २५ मार्च (हिं.स.) :


शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीसांनी अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. हरियाणा येथील एच आर ५६ ए ६२४३ या ट्रकवर बावळट येथे  ही कारवाई करण्यात आली. गोवा येथून नाशिकच्या दिशेन हा ट्रक दारू वाहतूक करत होता. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी स्वतः मैदानात उतरत ही धडक कारवाई केली. यात पोलिस प्रसाद कदम, महेश जाधव, सतीश कविटकर, प्रवीण सापळे, दर्शन सावंत, भुषण भोवर, सुनील नाईक यांनी मोलाचे काम बजावले. सापळा रचत ही कारवाई करण्यात आली.
  अवैध दारूची मोजणी सुरू असून अंदाजे ३० -४० लाखाचा मुद्देमाल, १० लाखांची गाडी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर हरियाणा येथील चालक रविंद्र रामकिशन याला ताब्यात घेण्यात आले. अवैध दारूवर केलेल्या या धडक कारवाईमुळे सावंतवाडी पोलीसांच विशेष कौतुक होतंय.

(हिन्दुस्थान समाचार)


 
Top