क्षेत्रीय

Blog single photo

सोलापुरात स्वयंसेवकांचे पथसंचलन

08/10/2019

सोलापूर 8 ऑक्टोबर (हिं.स) राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पथसंचालन झाले. सकाळी 7 वाजता झालेल्या या शानदार पथसंचलनात शहरातील संघाच्या तीन गटातील सुमारे 900 पेक्षा अधिक स्वयंसेवक पूर्ण गणवेषात सहभागी झाले होते.

 रा,स्व. संघाचे कामाच्या सोयीसाठी सोलापूर शहरात शिवाजी, दयानंद आणि अशोक असे तीन विभाग अर्थात गट तयार केले आहे. या तीनही गटाचे स्वतंत्र असे शानदार पथसंचलन काढण्यात आले.

शिवाजी गट

शिवाजी गटाचे पथसंचालन मंगळवारी सकाळी 7 वाजता निघाले. पूर्ण गणवेशातील स्वयंसेवक, पुढे घोड्यावर आरूढ होऊन हातात ध्वज घेतलेला स्वयंसेवक आणि तालबद्ध असे घोषपथक या संचलनात सहभागी झाले होते. सैफुल येथील सिद्धेश्वर पिठाच्या गिरणीपासून निघालेले संचन सैफुल, मंजू लॉन्स चौक, ओम गर्जना चौक, चिंतामणी गणेश मंदिर, स्वामी समर्थ चौक, विजापूर रोड मार्गे पुन्हा पिठाच्या गिरणीपाशी येऊन समाप्त झाले. 
या गटाच्या संचालनात जिल्हा कार्यवाह संतोष कुलकर्णी, गट प्रमुख सुनिल भराडकर, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख आदींसह ज्येष्ठ, तरूण, बाल असे मिळून सुमारे 200 पेक्षाही अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. दिलीप माने यांनी ओम गर्जना चौकात पुष्पवृष्टी करून स्वागत केले. 

 दयानंद गट

दयानंद गटाचे पथसंचालनास सकाळी 7 वाजता अवंती नगरातील पद्मश्री अपार्टमेंट येथून सुरू झाले. तेथून अरविंद धाम, निराळे वस्ती, नाथ रेसीडन्सी कॉर्नर, जुनी पोलीस लाईन, राघवेंद्र स्वामी मठ रस्ता, ऍम्बेसेडर हॉटेल कॉर्नर, पुना नाका, लोकमंगल पतसंस्थेमार्गे जावून पद्मश्री अपार्टमेंट येथे समाप्त झाले.या संचलनात पावणेचारशे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या संचलनात संघाचे जिल्हा सहकार्यवाह मदन मोरे, शहर कार्यवाह मिलिंद फडके गटप्रमुख उपेंद्र भीमनपल्ली यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, नगरसिंग मेंगजी सहभागी झाले होते. या ठिकाणच्या पथसंचलनाचे मनोहर सपाटे, महेश कोठे यांनी स्वागत केले. 
 अशोक गट

अशोक गटाचे पथसंचालनास जुन्या विडी घरकूलमधील लक्ष्मी चौक येथून सुरूवात करण्यात आली. तेथून यल्लम्मा मंदिर, प्रियदर्शिनी नगर, संभाजीराव शिंदे प्रशाला, वैष्णव मारूती मंदिर, पंचमूर्ती मंदिर, हरिओम मार्केट, विजय मारूती चौक, सागर चौक, एमएसईबी ऑफीस बोळ मार्गे लक्ष्मी चौकात समाप्त करण्यात आले. या संचलनात सव्वातिनशे स्वयंसेवक सहभागी झाले होते. या ठिकाणच्या संचलनात जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील, शहर संघचालक राजेंद्र काटवे, गटप्रमुख व्यंकटेश आरकाल आदींसह स्वयंसेवक सहभागी झाले होते. महेश कोठे यांनी सागर चौकात या संचलनाचे स्वागत केले.
हिंदुस्थान समाचार


 
Top