अंतरराष्ट्रीय

Blog single photo

सुलेमानीने लंडनसह दिल्ली हल्ल्याचा कट रचला होता- डोनाल्ड ट्रम्प

04/01/2020

लॉस एंजेलिस, 04 जानेवारी (हिं.स.) : अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेल्या इराणी मेंजर जनरल कासिम सुलेमानी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सुलेमानी याने दिल्ली आणि लंडनवरील हल्ल्याचा कट रचला होता असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

 सुलेमानी याला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात मारल्यानंतर यासंदर्भात ट्रम्प म्हणाले की, सुलेमानीच्या अत्याचारामुळे अनेक लोकांना यातना सहन कारव्या लागल्या होत्या. सुलेमानीला मारल्यानंतर. त्याचा दहशतवाद संपुष्टात आला. याचे आम्हाला समाधान वाटते आहे. सुलेमानी अमेरिकेतील राजकीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा कट रचत होता. याच कारणामुळे त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणने जर आमच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर ते थोपवण्याची आमची तयारी असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान सुलेमानी भारतात कधी, केव्हा आणि कशा प्रकारचा हल्ला करणार होता, याबाबत ट्रम्प यांनी अधिक खुलासा केलेला नाही.
हिंदुस्थान समाचार 
Top