मनोरंजन

Blog single photo

सैरा चे ट्रेलर 5 भाषांमध्ये प्रदर्शित

19/09/2019

सैरा चे ट्रेलर 5 भाषांमध्ये प्रदर्शित 

 हैदराबाद, 19 सप्टेंबर, (हिं.स) 

मेगास्टार चिरंजीवी यांच्या ' सै रा नरसिंह रेड्डी ' चे 5 भाषांमध्ये ट्रेलर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ' सै रा नरसिंह रेड्डी ' महान क्रांतिकारी उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या जीवनावर आधारित आहे. नरसिंह रेड्डी यांनी आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात ब्रिटिश सरकार विरुद्ध उठाव केला होता. विशेष म्हणजे 1857 च्या उठवापूर्वीच नरसिंह रेड्डी यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले होते. 

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि मेगास्टार चिरंजीवी सै रा नरसिंह रेड्डी चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चिरंजीवी महान क्रांतिकारी उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत तर बिग बी अमिताभ बच्चन नरसिंह रेड्डी यांचे गुरु गोसाई वेंकन्ना यांची भूमिका बजावणार आहे.

सै रा मेगास्टार चिरंजीवी यांचा 151 चित्रपट असून या भव्य चित्रपाटात तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे. चिरंजीवी, अभिताभ बच्चन यांच्या शिवाय या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, किच्चा सुदीप, विजय सेतुपती, जगपती बाबु, तमन्ना भाटिया, रवी किशन सहित अनेक मोठमोठे कलाकार सामिल आहेत. 

 चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून निर्मिती अभिनेते आणि चिरंजीवी यांचे पुत्र राम चरण यांनी कोनिडेला निर्मिती संस्थेच्या अंतर्गत केली आहे. युवा संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी यांनी चित्रपटास संगीत दिले आहे. चित्रपटाच्या हिंदी प्रदर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्म्सने घेतली आहे. 

 ट्रेलर ला भव्य प्रतिसाद 

अगदी थोड्याच कालावधीत ने 5 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी विविध सामाजिक माध्यमांवर सैरा चे ट्रेलर 5 भाषांमध्ये बघितले. ट्रेलर ला सामाजिक माध्यमांवर भरगोस प्रतिसाद मिळतो आहे. सामान्य सिनेरसिक आणि चित्रपट समीक्षकांना ट्रेलर पसंद पडले आहे. ट्रेलर मध्ये अभिनेते चिरंजीवी यांना उय्यालवाडा नरसिंह रेड्डी यांच्या रूपात अगदी प्रभावीपणे दाखविण्यात आले आहे. भव्य देखावे, मजबूत चित्रीकरणामुळे 1800 चा काळ निर्माण करण्यात सैरा चमूला यश आले आहे. चिरंजीवी यांचे दमदार संवाद तसेच प्रभावी पार्श्व संगीताने ट्रेलरला नवीन उभारी लाभली आहे. चिरंजीवी यांनी केलेले स्टंट तसेच तलवारबाजीने सर्वोंचे लक्ष वेधून घेतले आहे. या ऐतिहासिक चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सैरा 2 ऑक्टोबर रोजी 5 भाषांमध्ये एकच वेळी प्रदर्शित होणार आहे. 

 हिंदुस्थान समाचार


 
Top