अपराध

Blog single photo

अमरावतीत धुलीवंदनाच्या दिवशी राडा;सहा जणांनी मिळून युवकाला केली बेदम मारहाण

30/03/2021

अमरावती, ३० मार्च (हिं.स.) अमरावती शहरातील नवसारी जवळील यश बार जवळ काल सायंकाळी धुलीवंदनाच्या दिवशी सहा जणांनी एका 21 वर्षीय युवकाला काठीच्या साहाय्याने बेदम मारहाण केली,यात युवक मृत्यूशी झुंज देत असून सार्वजनिक ठिकाणी घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यातील जखमी व मारेकरी दोन्ही गुंडगिरी प्रवृत्तीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
एका जुन्या वादातून धुलीवंदनाच्या दिवशी हा राडा झाला. भूषण पोहोकार ( वय 21 )असे जखमी युवकाचे नाव असून तो रस्त्याने जात असतांना जुना वचपा काढण्यासाठी 6 युवक दबा धरून बसले होते त्यांनी युवकावर लाठी बुक्कीने जबर मारहाण केली यात त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गाडगेनगर पोलीसांनी हल्लेखोरांपैकी 5 जणांना अटक केली असून यातील एक जण पसार झाला आहे. विशेष म्हणजे यातील 4 युवक अल्पवयीन आहेत. या घटनेनंतर अमरावती जिल्हात खळबळ उडाली असून मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाले आहे. 
हिंदुस्थान समाचार 


 
Top